राजस्थान, बंगाल आणि महाराष्ट्रात एनडीएची पीछेहाट होणार; जनमत ‘इंडिया’ आघाडीलाच, सर्व्हेतील निष्कर्ष

राजस्थान, बंगाल आणि महाराष्ट्रात एनडीएची पीछेहाट होणार; जनमत ‘इंडिया’ आघाडीलाच, सर्व्हेतील निष्कर्ष

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होत आहे. निवडणूका जाहीर होण्याआधी झालेल्या अनेक सर्वेक्षणातून जनमत इंडिया आघाडीच्या बाजूने असून भाजप आणि एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातही महाराष्ट्रात महायुतीची पीछेहाट होणार असून महाविकास आघाडीला जनतेचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्येही एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

;

देशभरात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला अनेक ठिकाणी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात एनडीए आघाडीची पीछेहाट होण्याची शक्यता आहे. लोकपोल सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 26-28, काँग्रेसला 2-4 आणि भाजपला 11-13 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राजस्थानमधील लोकपोल सर्वेक्षणात एनडीए आघाडीला 17-19 जागा मिळण्याची शक्यता असून इंडिया आघाडीला 6 ते 8 जागा मिळतील, असा अंदाज आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने येथील सर्व 25 जागा जिंकल्या होत्या.

महाराष्ट्रात 23-26 जागा इंडिया आघाडीला मिळतील, असा अंदाज आहे. ABP CVoter सर्वेक्षणात इंडिया आघाडीला महाराष्ट्रात 20 जागा देण्यात आल्या असून युतीला 42 टक्के मते मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी एनडीए आघाडीला 43 टक्के मतांसह 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. न्यूज 18 च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 41 तर एनडीएला 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात एनडीएला 22 जागा आणि इंडिया आघाडीला 26 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;