मौलानाचा अल्पवयीन मुलीवर 4 महिने बलात्कार; गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, पोलिसांनी बेड्या ठोकल्या

मौलानाचा अल्पवयीन मुलीवर 4 महिने बलात्कार; गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, पोलिसांनी बेड्या ठोकल्या

उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एक मौलाना फूस लावून 14 वर्षीय मुलीवर गेल्या 4 महिन्यांपासून बलात्कार करत होता. मुलगी गर्भवती राहिल्याने आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्याही खावू घातल्या. यामुळे मुलीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण समोर आले असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकणयात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील नौबस्ता पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या भागात ही घटना घडली आहे. पीडित मुलगी ही गरिब कुटुंबातील असून तिचे पालक मजुरी करतात. आरोपी सोनू हाफिज हा त्यांच्या घरासमोरच राहतो. याच भागातील एका मशिदीमध्ये तो मौलाना म्हणून काम करतो.

आरोपी सोनू गेल्या काही काळापासून खाण्या-पिण्याच्या गोष्टींचे आमिष दाखवून पीडितेला घरी बोलावत होता. याचा गैरफायदा घेऊन आरोपी पीडितेवर बलात्कार करायचा. पीडितेने विरोध केल्यावर तो तिच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी द्यायचा. यादरम्यान पीडिता गर्भवती राहिल्याने तिची तब्येत बिघडली. त्यामुळे आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खावू घातल्या. गोळ्या खाल्ल्यानंतर पीडितेची तब्येत आणखीनच बिघडली. ईदच्या दिवशी तिची तब्येत आणखी बिघडल्याने आईने तिला खोदून खोदून विचारल्यावर तिने आपबिती सांगितली.

मुलीची तब्येत खराब होत असल्याचे पाहून कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे तपासणी केली असता पीडिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. यामुळे कुटुंबियांच्या पायाखालची जमिन सरकली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी नौबस्ता पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी मौलाना सोनू याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्या विरोधात बलात्कार, पॉस्को कायदा आणि जीवे मारण्याची धमकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कानपूर दक्षिणचे डीसीपी रवींद्र कुमार यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;