हा इशारा नाही तर सरकारची..; सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून संजय राऊत यांचं टीकास्त्र

हा इशारा नाही तर सरकारची..; सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून संजय राऊत यांचं टीकास्त्र

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर फरार होताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. गोळाबार झाला तेव्हा सलमान त्याच्या घरातच होता. या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. सर्वसामान्यांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे यांच्या गटाच्या, अजित पवार यांच्या गटाच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस सुरक्षा दिली जाते, मात्र सर्वसामान्य जनता वाऱ्यावर आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?

“सलमान खान हे सिनेविश्वातील मोठं नाव आहे, म्हणून तुम्ही मला त्याबद्दल प्रश्न विचारत आहात. पण मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार-खासदार आणि शिवसेना राष्ट्रवादीतून पक्ष सोडून गेलेल्यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून शिंदे गटात किंवा अजित पवार गटात जातोय, त्यालाही सुरक्षा पुरवली जातेय. भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांना, एकनाथ शिंदे यांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना आणि अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण दिलं जातंय. पण सामान्य जनता मात्र वाऱ्यावर आहे,” असं ते म्हणाले.

“सलमान खानच्या घराबाहेर झालेली फायरिंग हा इशारा नाही तर या बंदुकीच्या गोळ्यांनी भाजप पक्ष आणि त्यांचं सरकार याची पोलखोल करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री राजकारणात अडकले आहेत. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. मात्र त्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्यामागे यंत्रणा लावणं हेच आहे. पोलीस आयुक्त काय करत आहेत? पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही ना. त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही? की ते सुद्धा भाजपच्या गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या पालख्या वाहत आहेत? मुंबईच्या लोकल ट्रेन, मुंबईचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणं सर्वत्र हीच परिस्थिती आहे. फक्त बातम्या बाहेर येत नाहीत,” अशीही टीका त्यांनी केली आहे.

या घटनेनंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 15 ते 20 पथकं तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या घटनेची सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;