‘अब की बार गोळीबार सरकार’, सुप्रिया सुळे यांचा भाजपवर निशाणा
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर रविवारी पहाटे गोळीबार झाला. ही घटना धक्कादायक आहे. त्या भागात सामान्यांसह प्रतिष्ठीत लोकंही राहतात. पहाटे दुधवाले, फेरीवालेही फिरत असतात. ज्येष्ठ नागरिक फिरायला जातात, मुलं शाळेत जातात, लोकं जॉगींगला जातात. अशी परिस्थितीत भर रस्त्यात गोळीबार होत असेल तर ‘अब की बार गोळीबार सरकार’ यावर शिक्कामोर्तब होतोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
काही दिवसांपूर्वी पोलीस स्थानकामध्ये सत्तेत असणाऱ्या आमदाराने पोलीस स्थानकात गोळीबार केला. पोलीस स्थानकात गोळीबार करण्याची हिंमत होत असेल तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतील लोकांना काही वाटणार नाही. कारण ‘अब की बार गोळीबार सरकार’ म्हणावे लागेल, आकडेवारीच याला पुरावा आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुसंस्कृत पुण्यामध्ये कोयता गँग शब्दही माहिती नव्हता. आज कोयता गँग खुलेआम फिरते. त्याचा सोक्षमोक्ष का लावला जात नाही? हे लोण कॉलेजपर्यंत पोहोचले असून महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये याला कोणाचा तरी आशिर्वाद असावा, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List