श्वानासाठी आयशा जुल्का हायकोर्टात
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्काचा आवडता श्वान ‘रॉकी’चा चार वर्षांपूर्वी गूढ मृत्यू झाला. आपल्या श्वानाला चार वर्षांपासून न्याय मिळत नाही, त्याला न्याय मिळावा यासाठी आयशा जुल्काने थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. श्वानाला त्याच्या केअरटेकरने मारल्याचा आरोपही आयशाने केला असून कोर्टाकडे त्वरित न्यायाची मागणी केली आहे. केअरटेकर राम नाथू आंद्रे याने आपण मद्यधुंद अवस्थेत कुत्र्याचा गळा आवल्याचे मान्य केले होते. पोलिसांनी त्याला अटक केली. कारागृहात पाठवले. परंतु दोन दिवसांनी त्याला सोडून देण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List