मुलाखतीपूर्वी उमेदवाराला पाजली जाते दारू
नोकरीसाठी मुलाखत घेण्याची प्रत्येक कंपनीची वेगवेगळी पद्धत वेगळी असते. आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका कंपनीत मुलाखतीपूर्वी उमेदवाराला चक्क दारू पाजली जाते. त्या कंपनीत मुलाखतीसाठी गेलेल्या एका उमेदवाराने आपला हा अनुभव Reddit वर शेअर केला. तो म्हणाला, नुकतीच मी कंपनीत सेल्स मॅनेजर या पदासाठी मुलाखत दिली. तिथे सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱयांनी मुलाखत घेतली. त्यानंतर संध्याकाळी सगळय़ांना दारू पाजण्यासाठी बाहेर घेऊन गेले. यामागे त्यांचा मनोरंजनाचा हेतू नाही तर एखादी व्यक्ती भरपूर दारू प्यायल्यानंतरही कशा प्रकारे आपल्या मर्यादा सांभाळते, आपली लिमिट ओळखून या ऑफरला नम्रपणे नकार देते का? याची ही चाचणी होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List