बॉलीवूड जोडप्यांचे लग्न हे पैसा-प्रसिद्धीसाठी; नोरा फतेहीचे फटकारे
अभिनेत्री नोरा फतेही ही तोंडानेही फटकळ आहे. ती खरे बोलायला मागेपुढे पाहत नाही. जे मनात येईल ते ती बिनधास्त बोलते. आताही तिने नुकतेच बॉलीवूडमधील जोडप्यांबद्दल आपल्या मनात असलेल्या भावना बिनधास्त व्यक्त केल्या आहेत. बॉलीवूडमधील जे जोडपे लग्न करतात. त्यांच्यात खरे प्रेम असत नाहीत. ते फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी लग्न करतात, असे नोराने एका मुलाखतीत सांगितले आहे. ती म्हणाली की हे लोक फक्त त्यांच्या स्वतःच्या हेतूसाठी एकत्र राहतात. हे लोक खूप व्यावहारिक असतात. अशा परिस्थितीत लोक त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन एकत्र करतात. प्रसिद्ध होण्यासाठी एकमेकांचा वापर करतात. पैसा आणि सत्तेसाठी आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. आपण ज्याच्यावर प्रेम करत नाही त्याच्याशी लग्न करतात आणि नंतर पश्चाताप करतात, असे ती म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List