सलमान खान कोणाच्या निशाण्यावर? कधी धमकी, कधी फायरिंग.. ‘भाईजान’ला कोणाकडून धोका?

सलमान खान कोणाच्या निशाण्यावर? कधी धमकी, कधी फायरिंग.. ‘भाईजान’ला कोणाकडून धोका?

अभिनेता सलमान खानला अनेकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. इतकंच नव्हे तर स्वत: सलमानने अत्यंत महागडी बुलेटप्रूफ गाडीदेखील खरेदी केली होती. सलमानसोबत आणि त्याच्या वांद्रे इथल्या घराबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही रविवारी पहाटे धक्कादायक घटना घडली. सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर दोन अज्ञातांनी तीन राऊंड फायरिंग केली. गोळीबारानंतर आरोपी तिथून पळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेनं मुंबईकरांची भीती वाढली आहे. सलमानसोबतच सर्वसामान्यांनाही त्यांच्या सुरक्षिततेविषयी काळजी वाटू लागली आहे. गोळीबाराच्या या घटनेचा तपास मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच करत आहे.

बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सलमान खान

सलमानला गेल्या अनेक वर्षांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या बिश्नोई गँगकडून धोका आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि भारत-कॅनडाचा वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रारने अनेकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बिश्नोई आणि गोल्डी ब्रारने अनेकदा मुंबईत सलमानवर हल्ला करण्यासाठी त्यांचे शूटर्स पाठवले होते. लॉरेन्सचा अत्यंत खास गँगस्टर संपत नेहरा हा 2018 मध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करण्यासाठी आला होता. मात्र काही अनुचित घटना घडण्याआधीच हरयाणा पोलिसांनी नेहराला अटक केली होती. पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्याने सलमान खानवरील हल्ल्याच्या प्लॅनिंगचा खुलासा केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काही दिवसांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला तुरुंगातून धमकी दिली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्सने 1998 मधल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमानकडे माफीची मागणी केली होती. अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्याने दिला होता. सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, असं लॉरेन्स म्हणाला होता. धमक्यांनंतर सलमानने आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. पोलिसांकडून त्याला परवाना देण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे.

या वर्षी जानेवारी महिन्यात सलमानच्या पनवेल इथल्या फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न दोन अज्ञात लोकांनी केला होता. सुरक्षेची तार तोडून फार्महाऊसमध्ये शिरण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्या दोघांना सुरक्षारक्षकांनी पकडलं होतं. 1998 पासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. काळवीट शिकार प्रकरणानंतर तो बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;