बलाढय़ रशियाकडून युक्रेनचा पराभव होईल
रशिया आणि युव्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध टोकाला पोहोचले आहे. कोणीच मागे हटायला तयार नाही. परंतु या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये युव्रेनचा या युद्धात पराभव होईल, असा इशारा ब्रिटनचे जॉइंट पर्ह्सेसचे माजी कमांडर जनरल सर रिचर्ड बॅरन्स यांनी दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार, युव्रेन या वर्षी युद्ध गमावण्याची दाट शक्यता आहे. कारण रशियाविरुद्ध युव्रेन जिंकू शकत नाही. युव्रेनमधील सैन्य कमी होत आहे. त्यांच्याकडील दारूगोळा आणि हवाई हल्ल्यासाठी लागणारे साहित्य संपत आहे, तर या उलट रशिया मजबूत स्थितीत आहे. रशिया जोरदार आक्रमण करीत आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट दिसत आहे. रशियाकडे तोफखाना, दारूगोळा आणि नवीन शस्त्रांचा शस्त्रसाठा आहे. त्यामुळे ते अधिक त्यांचा वापर करत आहेत, असे रिचर्ड बॅरन्स यांनी म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List