पोलिसाला मारहाण करून स्वतःला जखमी केले

पोलिसाला मारहाण करून स्वतःला जखमी केले

 रेल्वेत चोरीला गेलेला मोबाईल तत्काळ शोधून द्यावा यासाठी 23 वर्षीय तरुणाने आरएके मार्ग पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. त्याने पोलीस अंमलदाराच्या नाकावर ठोसा मारला आणि मग स्वतःचे डोके टेबलावर आपटून पोलिसांना त्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

जान्झेब असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मोबाईल रेल्वेत हरवला होता. त्याबाबत रेल्वेमध्ये त्याने तक्रार दिली होती. पण त्यानंतरही मोबाईल न मिळाल्यामुळे तो आरएके मार्ग पोलीस ठाण्यात गेला. आपला मोबाईल तत्काळ शोधून द्यावा, यासाठी त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने अंमलदाराच्या नाकावर ठोसा मारला. ते जखमी झाल्यानंतर खानने स्वतःचेही डोके टेबलावर आपटले. त्यात जखमी झाल्यानंतर आपल्याला मारहाण केल्याच्या खोटय़ा गुह्यात अडकवण्याची त्याने धमकी दिली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;