दोन दिवसांनी उकाडा वाढणार

दोन दिवसांनी उकाडा वाढणार

 

मुंबईसह राज्यात 15 जुलैनंतर तापमान वाढण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असल्यामुळे काही भागात गारवा निर्माण झाला आहे. मात्र मुंबईत निरभ्र आकाश आणि प्रखर सूर्य प्रकाशामुळे नागरिकांचा घामटा निघत आहे. मुंबईत बहुतांशी भागात पारा 35 अंशांपर्यंत गेला आहे. रेल्वे, बस, टॅक्सी प्रवास करताना घामाच्या धारा निघत आहेत. त्यामुळे नागरिक थंड पेयांचा आधार घेताना दिसत आहेत. तर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पशु-पक्षी खास तयार करण्यात आलेल्या थंडगार पाण्याच्या प्रवाही पाण्यामध्ये डुबक्या मारताना दिसत आहेत.

 

असा करा बचाव

z उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी, –  दुपारी 12 ते सायं. 4 वाजेपर्यंत शक्यतो घरात थांबा

zघराबाहेरील कामे सकाळी 10 वाजेच्या आत किंवा सायंकाळी 4 नंतर करा

z पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला. थेट येणारा सूर्यप्रकाश / उन्हाला टाळावे.

z पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;