27 लाखांचे हिरे घेऊन तो यूपीला सटकला

27 लाखांचे हिरे घेऊन  तो यूपीला सटकला

सात वर्षांपूर्वी एका सराफाकडून जवळपास 27 लाखांचे हिरे घेऊन पसार झालेला भामटा उत्तर प्रदेशात जाऊन लपला होता. मुंबई गुन्हे शाखेने त्याला उचलून आणला. भोलाप्रसाद वर्मा असे त्या आरोपीचे नाव आहे.

2017 मध्ये भोलाप्रसाद याने एका हिरे कंपनीच्या मालकाचा विश्वास संपादन करून कंपनीचे 87.75 कॅरेटचे हिरे घेतले होते. मात्र ते हिरे हातात पडताच भोलाप्रसादने गद्दारी करत हिऱयांसह पळ काढला. ही बाब कंपनी मालकाच्या लक्षात येताच त्यांनी वांद्रे-कुर्ला संकूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भोलाप्रसादचा शोध सुरू केला. पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. गुन्हे शाखा युनीट-8चे पथकदेखील त्याचा शोध घेत होते. अखेर भोलाप्रसार यूपीमध्ये लपून राहत असल्याची माहिती काढल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहूल प्रभू, उपनिरीक्षक विकास मोरे तसेच यादव, सटाले या पथकाने यूपीतले गोरखपूर गाठून भोलाप्रसाद याला पकडून मुंबईला आणले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;