दीपेंद्र सिंगचे एका षटकात सहा षटकार
वृत्तसंस्था/ अल अमिरात (कतार)
सध्या येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या एसीसी प्रिमियर चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग एरीने एका षटकात 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. एका षटकात 6 षटकार नोंदवणारा दीपेंद्र सिंग हा तिसरा फलंदाज ठरला आहे.
नेपाळ आणि यजमान कतार यांच्यातील या सामन्यात 24 वर्षीय दीपेंद्र सिंगने 21 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 64 धावांची खेळी केली. नेपाळ संघातील असिफ शेखने 52 धावा झोडपल्या. नेपाळने 20 षटकात 7 बाद 210 धावा जमवल्या. क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम आतापर्यंत भारताच्या युवराज सिंगने तसेच विंडीजच्या किरॉन पोलार्डने केला आहे. युवराज सिंगने 2007 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार खेचले होते तर पोलार्डने 2021 साली झालेल्या सामन्यात लंकेच्या अकिला धनंजयच्या षटकात 6 षटकार मारले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List