नामधारी एफसीचा विजय
वृत्तसंस्था/ श्रीनगर
2023-24 च्या आय लिग फुटबॉल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या नामधारी एफसी संघाने शनिवारी येथे झालेल्या सामन्यात रियल काश्मीर एफसी संघाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यातील विजयामुळे नामधारी एफसी संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात 9 व्या स्थानावर राहिला.
या स्पर्धेतील नामधारी एफसीची मोहीम संपुष्टात आली असून त्यांनी या स्पर्धेत 24 सामन्यातून 27 गुणासह नववे स्थान मिळवले. नामधारी संघाने सात सामने जिंकले असून 6 सामने बरोबरीत सोडवले आहेत. तर 11 सामने गमवले आहेत. शनिवारच्या सामन्यात नामधारी एफसी संघातर्फे स्टिफन अॅक्वाने 20 व्या मिनिटाला तर इमानोल सदाबाने 24 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत नामधारीने रियल काश्मीरवर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. नामधारी संघातील मानवीर सिंगने 60 व्या आणि 90 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदवत रियल काश्मीरचे आव्हान संपुष्टात आणले. रियल काश्मीरतर्फे एकमेव गोल एल. राळतेने 86 व्या मिनिटाला केला. रियल काश्मीर एफसी संघाने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचवे स्थान मिळवले असून त्यांनी 24 सामन्यातून 40 गुण घेतले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List