राधिकाचे पदक निश्चित

वृत्तसंस्था/ बिशेक (किर्जीस्तान)

येथे सुरू असलेल्या वरिष्ठांच्या आशियाई महिलांच्या कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी भारताची एकमेव महिला मल्ल राधिकाने 68 किलो वजनगटात अंतिम फेरी गाठत आपले पदक निश्चित केले आहे.

राधिकाने गेल्या वर्षी झालेल्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते तर 2022 च्या वरिष्ठांच्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने दुसरे स्थान पटकावले होते. बिशेकमधील स्पर्धेत राधिकाने पहिल्या फेरीच्या लढतीत कजाकस्तानच्या अल्बिनाचा तांत्रिक गुणावर पराभव केला. त्यानंतर तिने पुढील फेरीतील लढतीत किर्जीस्तानच्या गुलनुराचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता सुवर्णपदकासाठीच्या लढतीत राधिकाची गाठ जपानच्या नोनोका ओझाकीशी होणार आहे. या स्पर्धेमध्ये 50 किलो वजनगटात भारताच्या शिवानी पवारचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. चीनच्या फेंगने शिवानीचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. 55 किलो गटात भारताच्या तमन्नाला पात्र फेरीतच हार पत्करावी लागली. जपानच्या कियोकाने तमन्नाचा 9-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरी गाठली

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;