भारताचा दक्षिण कोरियावर विजय
वृत्तसंस्था/ चेंगशा (चीन)
बिली जिन किंग चषक सांघिक महिलांच्या टेनिस स्पर्धेतील आशिया ओसेनिया गट 1 मधील लढतीत भारताने दक्षिण कोरियाचा 2-1 अशा फरकाने पराभव केला.
या विजयामुळे भारतीय संघाने अ गटातून दुसरे स्थान मिळवले असून त्यांनी तीन सामने जिंकले असून एक सामना गमवला आहे. भारत आणि द. कोरिया यांच्यातील लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या ऋतुजा भोसलेने द. कोरियाच्या पार्कचा 6-2, 6-2 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात द. कोरियाच्या जेंगने अंकिता रैनाचा 6-2, 6-3 असा पराभव करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली होती. पण शेवटच्या दुहेरीच्या सामन्यात अंकिता रैना आणि प्रार्थना ठोंबरे यांनी कोरियाच्या पार्क आणि किम यांचा 6-4, 6-4 असा फडशा पाडत कोरियाचे आव्हान या लढतीत 2-1 असे संपुष्टात आणले. हा दुहेरीचा सामना दीडतास चालला होता. या स्पर्धेमध्ये भारताने पहिल्या सामन्यात पॅसिफिक ओसेनियाचा 3-0, चीन तैपेईचा 2-1 तर द. कोरियाचा 2-1 असा पराभव केला. मात्र चौथ्या लढतीत चीनने भारतावर 3-0 अशी एकतर्फी मात केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List