मयांकला दोन सामने हुकण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ लखनौ
लखनौ संघातील वेगवान गोलंदाज मयांक यादव याला दुखापतीमुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील आगामी दोन सामने हुकण्याची शक्यता कर्णधार केएल राहुलने व्यक्त केली आहे. या स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या दिल्ली आणि लखनौ यांच्यातील सामन्यात दिल्ली संघाला जेक फ्रेजर मॅकगर्क या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने जलद फटकेबाजी करत शानदार विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाच्या फ्रेजरचे आयपीएलमधील हे पदार्पण होते. त्याने पदार्पणातच 35 चेंडूत जलद 55 धावा झोडपल्या. फ्रेजरने पंतसमवेत 77 धावांची भागीदारी केली. त्यामध्ये पंतचा वाटा 41 धावांचा होता. शुक्रवारच्या सामन्यात यादवची गैरहजरी संघाला चांगलीच जाणवली अशी प्रतिक्रिया कर्णधार राहुलने व्यक्त केली आहे. मयांक यादवच्या पोटाचा स्नायू दुखावल्याने त्याला अद्याप वेदना जाणवत आहेत. ही दुखापत पूर्ण बरी होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने त्याला या स्पर्धेतील कदाचित पुढील दोन सामन्यांना मुकावे लागेल असा अंदाज कर्णधार राहुलने व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List