तुरुंगात केजरीवालांवर अन्याय केला जातोय; मूलभूत हक्कही नाकारले जात असल्याचा ‘आप’चा गंभीर आरोप

तुरुंगात केजरीवालांवर अन्याय केला जातोय; मूलभूत हक्कही नाकारले जात असल्याचा ‘आप’चा गंभीर आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे नसताना त्यांना जेलमध्ये पाठवले आहे. केंद्र सरकारच्या सांगण्यावरून अरविंद केजरीवाल यांना तुरुंगातील किमान मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यांना कुटुंबीयांशी प्रत्यक्ष भेट नाकारताना झरोक्यातून (विंडो बॉक्स) बोलण्यास सांगितले जात आहे, असा गंभीर आरोप शुक्रवारी आम आदमी पार्टीने केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही केजरीवाल यांच्या भेटीची परवानगी नाकारण्यात आली, असेही आपने म्हटले आहे.

दिल्लीतील कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यांच्या मूलभूत हक्कांचे पालन होत नसल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज केला. कारागृह नियम 602 आणि 605 नुसार कैद्याला भेटणाऱयांना प्रत्यक्ष भेटीची परवानगी मिळते. परंतु मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांना त्यासाठीची परवानगी नाकारली. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी भेटीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भेटू दिले नाही. त्यांना झरोक्यातून बोलण्यासाठी सांगण्यात आले. एवढे अमानवीय वर्तन कशासाठी, असा सवाल संजय सिंह यांनी केला. तिहार तुरुंगामध्ये शेकडो भेटीगाठी समोरासमोर झाल्या आहेत. परंतु दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अपमानित करण्याच्या हेतूने, जाणीवपूर्वक त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे संजय सिंह यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी

 मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे. ईडीने केलेली अटक वैध असल्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा तरी केजरीवाल यांना दिलासा मिळणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. केजरीवाल हे तिहार कारागृहात आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;