Lok Sabha Election 2024 : निर्लज्ज! तो फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाड यांची निवडणूक आयोगावर टीका

Lok Sabha Election 2024 : निर्लज्ज! तो फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाड यांची निवडणूक आयोगावर टीका

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर देशभरातील पक्षांच्या कार्यालयांवरील नावं चिन्ह झेंडे झाकण्यात येतात.आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व पक्ष कार्यालयांवरील नावं व चिन्ह, नेत्यांचे फोटो झाकण्यात आले आहेत. मात्र ठाण्यातील भाजपच्या कार्यालयाकडून मात्र आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील भाजपच्या कार्यालयावरील नाव चिन्ह तसंच असून त्याच ठाण्यातील काँग्रेसच्या कार्यालयावरील नेत्यांचे फोटो, नाव व चिन्हावर वर्तमान पत्र चिकटवून ते झाकण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप व काँग्रेसच्या ठाण्यातील पक्ष कार्यालयाचे फोटो शेअर करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. आव्हाड यांनी निर्लज्ज अशा एका शब्दात निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;