भावाचे निधन, बहीण व्हेंटिलेटरवर, दीड वर्षांपासून हाताला नाही काम, जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर, अभिनेत्री म्हणाली..

भावाचे निधन, बहीण व्हेंटिलेटरवर, दीड वर्षांपासून हाताला नाही काम, जेनिफर मिस्त्रीवर दु:खाचा डोंगर, अभिनेत्री म्हणाली..

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून अनेक कलाकारांनी या मालिकेला कायमचा राम राम केलाय. जुने काही कलाकार मालिका सोडून गेले असून नवीन कलाकारही मालिकेत दाखल झाले आहेत. या मालिकेबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही नेहमीच बघायला मिळते. या मालिकेचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अर्थात जेनिफर मिस्त्री हिने अत्यंत गंभीर आरोप केले.

जेनिफर मिस्त्री हिने तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. जेनिफर मिस्त्री हिचे आरोप ऐकून सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. जेनिफर मिस्त्री ही सतत असित कुमार मोदी यांच्यावर टीका करताना दिसली. आता जेनिफर मिस्त्री ही तारक मेहता मालिकेत नाहीये. मात्र, आता जेनिफर मिस्त्री तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलीये.

जेनिफर मिस्त्री हिच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळल्याचे बघायला मिळतंय. जेनिफर मिस्त्री हिच्या भावाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. यामुळे सात बहिणींची जबाबदारी ही जेनिफर मिस्त्री हिच्यावर आलीये. हेच नाही तर मागील दीड वर्षांपासून जेनिफर मिस्त्री हिच्या हाताला काम नाहीये. यामध्येच असित कुमार मोदी यांच्यासोबत असलेली केसही सुरू आहे.

आता या समस्यांमध्ये वाढ म्हणजे जेनिफर मिस्त्री हिची बहीण आजारी असून ती व्हेंटिलेटरवर आहे. जेनिफर मिस्त्रीच्या बहिणींवर रूग्णालयात उपचार सुरू असून ती त्यांच्या मुळगावी आहे. बहिणीची तब्येत अत्यंत गंभीर असल्याने बहिणीला सोडून येऊ शकत नसल्याचेही जेनिफर मिस्त्रीने नुकताच स्पष्ट केले. काम मिळत नसल्याचेही जेनिफर मिस्त्रीने सांगितले.

जेनिफर मिस्त्री म्हणाली की, माझ्या बहिणींला सर्वात जास्त सध्या माझी गरज आहे, यामुळे मी तिला एकटे सोडून नाही येऊ शकत. आयुष्यात खूप जास्त अडचणी आहेत. मागील दीड वर्षांपासून माझ्याकडे काही काम नसून सात मुलींची जबाबदारी ही माझ्यावर आहे. जेनिफर मिस्त्री हिने हे देखील म्हटले की, कदाचित मला एका मालिकेत भूमिका मिळू शकते, त्यांना माझ्यासारख्या व्यक्तीचा शोध आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;