सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणाऱ्यांना धमकावण्यात येत आहे; रोहित पवार यांचा आरोप
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणाऱ्यांना धमकावण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. कंत्राटदार असलेल्या अनेक लाभार्थ्यांकडून या धमक्या देण्यात येत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच जिल्हा बँक कर्मचाऱ्यांनाही प्रचाराच्या कामाला जुंपले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अनेक मोठमोठे कंत्राटदार, पादधिकारी यांना सामान्य जनता मलिदा गँग म्हणते. ही मलिदा गँग स्वतःच्या फायद्यासाठी, कंत्राट जाऊ नये, यासाठी अशा धमक्या देत आहेत. शहरी भागात गुंडाकडून धमक्या दिल्या जात आहेत. या भागात राहायचे असेल तर तुम्ही साहेबांचा प्रचार करू नका, अशा धमक्या गुंड देत आहेत. बारामतीत अशा गोष्टी होत असल्याचे जनताच आम्हाला सांगित आहे. या चुकीच्या गोष्टी आहेत. याआधी बारामीतत अशा गोष्टी झालेल्या नाहीत. अशा चुकीच्या प्रथा काहीजण पाडत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List