नाहीतर आज प्रत्येक बापाची मुलगी, मुलगा.., विद्या बालन संतापात असं काय म्हणाली?

नाहीतर आज प्रत्येक बापाची मुलगी, मुलगा.., विद्या बालन संतापात असं काय म्हणाली?

अभिनेत्री विदया बालन सध्या तिच्या आगामी ‘दो और दो प्यार’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात विद्या हिच्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र विद्या बालन स्टारर ‘दो और दो प्यार’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. अभिनेत्री देखील तिच्या आगामी सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. याच दरम्यान विद्या हिने तिच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल आणि तिच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विद्या बालन, तिचं वक्तव्य, आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालंतर, विद्या हिने स्वतःच्या मेहमतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्थान भक्कम केलं आहे. अभिनेत्रीच्या प्रवासात तिच्यासाठी कोणी गॉडफादर म्हणून मदतीला आलं नाही. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विद्या हिने घराणेशाहीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नेपोटिज्मवर काय म्हणाली विद्या बालन

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मला नाही माहिती यावर मी काय उत्तर देऊ कारण नेपोटिज्म आणि नेपोटिज्म शिवाय आज मी याठिकाणी आहे… इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही. नाहीतर आज प्रत्येक बापाची मुलगी, मुलगा यशस्वी असता…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी माझं काम करुन आनंदी आणि समाधानी आहे… अनेकदा मला असं वाटलं की, मला देखील लोकांचा आधार मिळाला असता, तर त्यांची माझ्या प्रति वागणूक योग्य असती. पण मला वाटतं की याचा खरंच काही फरक पडत नाही.’

पास्ट रिलेशनशिपबद्दल देखील विद्या हिने मोठा खुलासा केला आहे…

हार्टब्रेक आणि पास्ट रिलेशनशिपबद्दल विद्या बालन म्हणाली, ‘प्रेमात माझी फसवणूक झाली आहे. मी ज्या मुलाला डेट केलं होतं, त्याने माझी फसवणूक केली… तो प्रचंड वाईट होता…’, विद्या हिने सिनेमा निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत लग्न केलं आहे. अभिनेत्री आता तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे…

कधी प्रदर्शित होणार ‘दो और दो प्यार’ सिनेमा

विद्या बालन हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री प्रतिक गांधी याच्यासोबत ‘दो और दो प्यार’ सिनेमात झळकणार आहे. सिनेमाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अभिनेत्री इलियाना डिक्रुझ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तर विद्या ‘भूल-भुलैया 3’ मध्ये देखील दिसणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;