लंडनला जाणाऱ्या ट्रेनमध्ये माथेफिरूचा प्रवाशांवर चाकूहल्ला
ब्रिटनमधील केंब्रिजशायर येथे शनिवारी ट्रेनमध्ये अनेक प्रवाशांवर चाकूने हल्ला झाला. प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये काही जणांनी इतरांवर चाकूने वार केले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन जणांना अटक केली. ट्रेनला हंटिंग्डन येथे थांबवण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी केंब्रिजशायर कॉन्स्टेब्युलरीने सांगितले की, त्यांच्या अधिकाऱ्यांनी ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलीस यांच्यासोबत मिळून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List