मुंबईच्या हवेची गुणवत्ता ’समाधानकारक’
गेल्या आठवडय़ापासून मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी लागत असल्याने मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली आहे. एरव्ही दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण चिंतेचा विषय असते. यंदा पावसामुळे फटाके कमी फुटले आणि प्रदूषण सामान्य पातळीवर राहिले आहे. रविवारी मुंबई शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ म्हणून नोंद झाला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ ऍपवरील नोंदीनुसार, शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 53 अंकांवर होता. तसेच भायखळा येथे 38, कुलाब्यात 34, घाटकोपरमध्ये 46, कांदिवली-31, भांडुप-43, माझगाव- 42, मालाड- 44, पवई- 46, शिवडी- 42, वरळी-44 आणि शीव येथे 39 इतका हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List