Buldhana News – बुलढाणा मतदारसंघातील मतदार यादीत महाघोळ; हजारो दुबार व मयत नावे यादीत, शिवसेनेचा आरोप

Buldhana News – बुलढाणा मतदारसंघातील मतदार यादीत महाघोळ; हजारो दुबार व मयत नावे यादीत, शिवसेनेचा आरोप

बुलढाणा विधानसभा मतदार यादीत महाघोळ असून बुलढाण्यात ७,५०० दुबार मतदार तर ५,२९१ मतदार मयत असून मयताच्या नावावर मतदान झाले आहे. तर सागवन गावामध्ये एकाच घरात १२६ लोक ते सुद्धा विविध जाती धर्माचे राहत असल्याची मतदार यादी सांगत असून बुलढाणा मतदार संघातील मतदार यादीत घोळ असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वी मतांचा घोळ थांबवावा आणि बोगस मतदार वगळावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व डी.एस. लहाने यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली आहे.

हॉटेल रामा ग्रँडच्या सभागृहात दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत बुलढाणा मतदार संघाच्या मतदार यादीचे पोस्टमार्टम केले. मतदार यादी क्रमांक, पेज क्रमांक तसेच घर क्रमांक सहा अशा प्रकारे त्यांनी मतदार यादीतील घोळ पत्रकारांसमोर उजागर केला. केवळ ८४१ मतांनी झालेल्या पराभवामागे बोगस मतदार, मयत मतदार तसेच बुध कॅप्चरिंगचा प्रकार असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करतांना जयश्री शेळके यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सागवन, सुंदरखेड तसेच मोताळा तालुक्यातील निपाणा गावची मतदार यादी समोर मांडली. निपाणा गावामध्ये एकूण १,१२६ मतदार आहेत. त्यात १३२ मतदार मयत आहेत. तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मयत मतदारांच्या नावावर मतदान झाले. अशीच अवस्था सुंदरखेडच्या मतदार यादीतील क्रमांक ५०६ मतदाराची आहेत. पंधरा वर्षांपूर्वी मयत झालेल्या मतदाराचे नाव यादीत अजूनही कायम आहे. २००४ मध्ये सरदारसिंग देवसिंग गायकवाड यांचे निधन झाले होते परंतु २१ वर्षानंतर सुद्धा दिवंगत सरदार सिंग मतदार यादीत कायम आहेत. यावेळी जयश्री शेळके यांनी मागणी केली की प्रशासनाने तात्काळ या संपूर्ण घोळाची दखल घेवून मयत आणि बोगस मतदार हटवावे. ज्यांची नावे दोन वेळा आहेत, ती वगळावी, असेही जयश्री शेळके म्हणाल्या.

एकाच घरात हिंदु-मुस्लिम-बौद्ध : डी. एस. लहाने

सागवनमध्येही मतदार यादीत मोठा घोळ असून याठिकाणी एकाच घरात १२६ लीवा राहतात, असा खळबळजनक दावा उबाठा नेते डी. एस. लहाने यांनी केला आहे. मतदार यादी क्रमांक २६३ पासून ते २७५ पर्यंत एकूण १२६ मतदार एकाच घरात आहेत. विशेष म्हणजे एक हजार स्वेअर फूटच्या छोट्याश्या घरात १२६ लोक राहणे कसे शक्य आहे? असा सवाल करीत ते पुढे म्हणाले की, मजेशीर गोष्ट म्हणजे हे सर्व १२६ लोक विविध जाती धर्माचे आहेत. यात हिंदू तर आहेतच पण मुस्लिम आणि बौद्धसुद्धा आहेत. घराचा पत्ता नसलेले ३,८३५ मतदार या मतदार यादीत असल्याचेही लहाने म्हणाले, सागवनमध्ये राहणार्‍या मतदाराचे घर बुलढाणा आणि सावरगांव डुकरे कसे काय असू शकते? हा सवाल करतांना त्यांनी मतदार यादीतील घोळ थांबवावा, अशी मागणी केली. पत्रकार परिषदेला लखन गाडेकर, गजानन उबरहंडे, पुरुषोत्तम हेलगेंसह विविध नेते मंडळी उपस्थित होते

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी करतात असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. तसेच मत चोरी म्हणजे सामान्य मतदाराचा अपमान...
Ratnagiri News – कोसळणाऱ्या पावसामुळे केळशी पंचक्रोशीत भात शेतीचे प्रचंड नुकसान, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला
Ratnagiri News – परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, बांधावर पोहचत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर
Photo – पवईमध्ये थरारक ओलीसनाट्य आणि एन्काउंटर
Buldhana News – बुलढाणा मतदारसंघातील मतदार यादीत महाघोळ; हजारो दुबार व मयत नावे यादीत, शिवसेनेचा आरोप
IND Vs AUS – ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपला, टीम इंडियाला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी 339 धावांचं आव्हान