महिला वर्ल्ड कपच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाची गरूड झेप, झुलन गोस्वामीचा विक्रम मोडला
ICC Women’s World Cup 2025 आता अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता दुसरा सेमी फायनलचा सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळला जात आहे. या दोन्ही संघांमधील विजयी संघ रविवारी (2 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे. याच वर्ल्डकप दरम्यान एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज मारिजन कॅपने टीम इंडियाच्या दिग्गज माजी वेगावन गोलंदाज झुलन गोस्वामीचा विक्रम मोडित काढला आहे. मारिजन कॅप आता महिला वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे.
टीम इंडियाची माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आपल्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवलं. त्यामुळेच महिला वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 43 विकेट घेण्याचा विक्रम तिच्या नावावर होता. 2022 साली ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली. तिचा हा विक्रम ICC Women’s Word Cup 2025 मध्ये मोडित निघाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मारिजन कॅपने इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये घातक गोलंदाजी करत इंग्लंडचा अर्धा संघ तंबुत धाडला होता. त्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण संघ 194 धावांवर बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने अगदी थाटात फायनलमध्ये प्रवेश केला. मारिजन कॅपने या सामन्यात पाच विकेट घेतल्य. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये आता तिच्या नावावर एकूण 44 विकेट्सची नोंद झाली. 44 विकेट्समुळे मारिजन कॅप आता महिला वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List