नुकसानीमुळे लातुरात शेतकर्‍याची पेटवून घेऊन आत्महत्या

नुकसानीमुळे लातुरात शेतकर्‍याची पेटवून घेऊन आत्महत्या

राज्यातील नाकर्त्या सरकारने नुकसानभरपाई न दिल्याने शेतकरी मरणाला कवटाळत आहेत. त्यातच आज शेतातील नुकसान्-ाीची धास्ती घेऊन नागरसोगा येथील बिभीषण पंढरीनाथ साळुंके या तरुण शेतकर्‍याने रविवारी रात्री स्वत:ला पेटवून घेतले. त्याला लातूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना आज सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

अवघी एक एकर शेती, वृद्ध आई, वडील अंध आहेत. अशातच परतीच्या पावसाने शेतीतही मोठे नुकसान झाल्याने बिभीषण पंढरीनाथ साळुंके (३३) या तरुण शेतकर्‍याने रविवारी रात्री स्वतःच्या घरात जाळून घेतले होते. आगीचा भडका एवढा होता की त्यांचे पूर्ण शरीर गंभीररीत्या भाजले होते. त्यामुळे त्याला लातूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. बिभीषण पंढरीनाथ साळुंके याच्या पश्चात वृद्ध आई, अंध वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या नावे विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज, इतर खाजगी देणी असून, शेतीमध्ये काहीच उत्पन्न निघालेले नाही. आता हे कर्ज फेडायचे कसे आणि खर्च भागवायचा कसा, या चिंतेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;