मासिक पाळीपूर्वी होतोय हिरवा रक्तस्त्राव? व्हा सावध, डॉक्टरांकडून जाणून घ्या कारण

मासिक पाळीपूर्वी होतोय हिरवा रक्तस्त्राव? व्हा सावध, डॉक्टरांकडून जाणून घ्या कारण

स्त्रीच्या मासिक पाळीच्या चक्रावर जीवनशैली, अन्न, झोप आणि इतर अनेक घटकांचा प्रभाव असतो. मासिक पाळी ठरलेल्या वेळेत येणं देखील फार महत्त्वाचं असतं. नाहीतर महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात जर हिरवा रक्तस्त्राव होत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करु नका… मासिक पाळीपूर्वी हिरवा रक्तस्त्रावर होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा. काही महिलांना योनीतून हिरवा स्त्राव होतो. हे संसर्ग किंवा हार्मोनल असंतुलन दर्शवतं.. स्त्रीरोगतज्ज्ञांकडून योनीतून हिरवा स्त्राव येण्याचे कारण जाणून घेऊ.

बॅक्टेरियल योजिनोसिस हे बॅक्टेरियाच्या संसर्गाचे कारण आहे. ज्यामुळे योनीतील चांगले बॅक्टेरिया आणि वाईट बॅक्टेरिया यांच्यातील संतुलन बिघडतं. या असंतुलनामुळे हिरवा किंवा पिवळा स्त्राव होतो. या स्त्रावाला वास येतो आणि खाज सुटते. कधीकधी अस्वच्छता किंवा साबण किंवा वॉशचा वारंवार वापर केल्याने ही समस्या वाढते.

जर हिरवा स्त्राव फेसयुक्त, जाड आणि दुर्गंधीयुक्त असेल तर ते ट्रायकोमोनियासिस नावाच्या संसर्गाचं लक्षण असू शकतं. हा एसटीआय एका परजीवीमुळे होतो आणि त्यामुळे योनीतून जळजळ, खाज सुटणे आणि लघवी करताना वेदना तसेच संभोग करताना अस्वस्थता येऊ शकते. हा संसर्ग जोडीदाराकडून देखील होऊ शकतो… अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे.

एवढंच नाही तर, यीस्ट इन्फेक्शनमुळे पांढरा, दहीसारखा स्त्राव होतो. परंतु गंभीर प्रकरणांमध्ये, तो पिवळा किंवा हिरवा असू शकतो. हे कॅन्डिडा नावाच्या बुरशीमुळे होऊ शकते. यामुळे योनीमध्ये खाज सुटणे, सूज येणे आणि जळजळ होणे यासारखी लक्षणे उद्भवू शकतात आणि जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते तेव्हा ही समस्या उद्भवते.

अस्वच्छ सॅनिटरी पॅड, घट्ट किंवा कृत्रिम अंडरवेअर घातल्यामुळे देखील समस्या उद्भवते. ज्यामुळे योनीमध्ये संसर्ग होऊ शकतो. कधीकधी महिलांची योनी बराच काळ ओली राहते. ज्यामुळे संसर्ग वाढू शकतो. अशा परिस्थितीत महिलांना पिवळा स्त्राव होणे सामान्य आहे. यासाठी सुती अंडरवेअर घाला.
कधीकधी, गर्भाशय ग्रीवामध्ये जळजळ किंवा संसर्गामुळे हिरवा स्त्राव होतो. हे बॅक्टेरिया किंवा योनीमार्गाच्या संसर्गाशी संबंधित असू शकते. गर्भाशय ग्रीवाच्या संसर्गामुळे वेदना, जळजळ आणि कधीकधी रक्तस्त्राव होऊ शकतो.

हिरवा स्त्राव टाळण्यासाठी, काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, दररोज स्वच्छ ठेवा. योनीमार्ग नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच, स्पे किंवा इंटिमेट वॉश वापरू नका. तुमच्या आहारात दही, हिरव्या भाज्यांचा समावेश करा आणि पुरेसे पाणी प्या. जर तुम्हाला वारंवार संसर्ग होत असेल तर तात्काळ डॉक्टरांना भेटा.

टीप: येथे दिलेली माहिती फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या शहरात कोणत्या रुग्णालयात मिळतात मोफत उपचार, पण कसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती तुमच्या शहरात कोणत्या रुग्णालयात मिळतात मोफत उपचार, पण कसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
PM Ayushman Yojana Find Hospitals: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांपासून अनेक योजना राबवत आहेत. त्यातील एक म्हणजे आयुष्मान भारत...
लक्ष्मीपूजन निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये नेत्रदीपक फुलांची सजावट
नरेंद्र मोदींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांनी मदत केली पण त्यांनी त्याचे पांग कसे फेडले ते सर्वांनी बघितलं – संजय राऊत
महाकाल मंदिरात भस्मआरती दरम्यान भक्ताचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी निमलष्करी दलावर मोठा हल्ला; BLA च्या हल्ल्यात 5 सैनिक ठार, दोनजण गंभीर जखमी
मासिक पाळीपूर्वी होतोय हिरवा रक्तस्त्राव? व्हा सावध, डॉक्टरांकडून जाणून घ्या कारण
कामोठ्यात इमारतीला भीषण आग, आई व मुलीचा होरपळून मृत्यू