शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी पदभार स्वीकारला
गेल्या चार दिवसांपासून कुलगुरूविना रिक्त असलेल्या शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी आज पदभार स्वीकारला. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात आजपर्यंत कुलगुरूपद रिक्त राहिल्याने सर्वत्र चर्चा सुरू होत्या.
दरम्यान, सुसंवाद, विश्वास आणि पारदर्शकता या मूल्यांवर आधारित कार्य करून शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू या, असे आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
कुलगुरू डॉ. गोसावी यांनी आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्य प्रशासकीय इमारतीतील कुलगुरू दालनामध्ये कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी अर्चना गोसावी यांच्यासह परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. तानाजी चौगुले, डॉ. शरद बनसोडे, अभिजित रेडेकर, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. मेघा गुळवणी आदी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List