अहिल्यानगरमध्ये डिग्रसमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगी जखमी
शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका 14 वर्षीय शाळकरी मुलीवर हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात घडली. या हल्ल्यात मुलगी गंभीरित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मुलीवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.
डिग्रस येथील प्रगती सखाराम श्रीराम ही मुलगी शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शाळेत जात होती. ती खेमनर वस्तीजवळ आली असता कपाशीच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. ही घटना गावातील देवराम खेमनर यांनी पाहिली आणि त्यांनी त्या मुलीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र बिबट्याने तिच्या मानेला चावा घेतला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता.
खेमनर यांनी घटनास्थळी थांबून कापडाने जखम बांधून घेत रक्तस्त्राव बंद केला आणि तिला तात्काळ लोणी येथील प्रवारा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. मात्र त्या ठिकाणी लस उपलब्ध नसल्यामुळे मुलीला संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List