खासगी शाळांची फी ठरवणे सरकारचा अधिकार नाही, सरकार फक्त नफेखोरी रोखू शकते, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

खासगी शाळांची फी ठरवणे सरकारचा अधिकार नाही, सरकार फक्त नफेखोरी रोखू शकते, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

दिल्ली सरकार खासगी शाळांच्या फीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकत नाही किंवा फी वाढ रोखू शकत नाही. जर एखादी खासगी शाळा जास्तीचे शुल्क वसूल करत असेल किंवा नफेखोरी करत असेल तर तेव्हाच सरकार शुल्क नियंत्रित करू शकते, असे हायकोर्टाने म्हटले.

दिल्ली सरकारचे शिक्षण संचालनालय विनाअनुदानित खासगी शाळांची फी रचना ठरवू शकत नाही. या शाळा शिक्षणाचे व्यावसायिकरण करत असतील किंवा विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करत असतील तरच सरकार त्यावर नियंत्रण आणू शकते, असे मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्या. तुषार राव गेडेला यांनी यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले. शाळेची फी रचना ही उपलब्ध पायाभूत सुविधा, तसेच अन्य सुविधा, शिक्षण आणि कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन, शाळेच्या विकास किंवा भविष्यातील योजना यांचा विचार करून निश्चित केले पाहिजे, असे हायकोर्टाने म्हटले.

दिल्ली हायकोर्टाने दिल्ली शिक्षण संचालनालय आणि विविध विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्या. दिल्लीतील दोन विनाअनुदानित खासगी शाळांनी 2017-18 साली फीमध्ये वाढ केली होती. याविरोधात ही याचिका होती. ही याचिका यापूर्वी एकल खंडपीठाने फेटाळली होती. एकल खंडपीठाच्या निर्णयावर दिल्ली हायकोर्टाने सहमती दर्शवली. जर शिक्षण विभागाला आढळून आले की, शाळेने दिलेला जमाखर्च नियमानुसार नाही, तर शाळेविरुद्ध शिक्षण विभाग कारवाई करू शकते. शाळांनी नफेखोरी किंवा शिक्षणाचे बाजारीकरण करू नये, यासाठी अशा कारवाई आवश्यक आहेत. शाळेने मिळवलेला नफा हा केवळ शाळा आणि शिक्षणासंबंधी उद्देशांवरच खर्च व्हावा. व्यवस्थापनाच्या कोणत्याही वैयक्तिक उपयोगासाठी नसावा, हे यातून सुनिश्चित होईल, असे हायकोर्ट म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोणते मनुके किंवा किशमिश आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? पिवळे की काळे? कोणते मनुके किंवा किशमिश आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? पिवळे की काळे?
कोणते मनुके किंवा किशमिश आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? पिवळे की काळे? सुकामेवा आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे असतात हे आपल्या सर्वांनाच...
नाद करा पण ‘हिटमॅन’चा कुठं! रोहित शर्मानं सिडनीत ठोकलं 50 वं आंतरराष्ट्रीय शतक, विराटचंही अर्धशतक
Video – घर की मुर्गी दाल बराबर आणि बाहेरचा सावजीचा चिकन मसाला चांगला लागतो!
Video – डॉ. संपदा मुंडे प्रकरणातील खासदार कोण? प्रशासनाचा राजकीय वापर करणारा अभिजित निंबाळकर कोण?
वर्ल्डकप खेळण्यासाठी हिंदुस्थानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 2 महिला क्रिकेटरशी इंदूरमध्ये गैरवर्तन, आरोपीला अटक
राजस्थानमधून फुगे विकण्यासाठी आलेल्या दाम्पत्याच्या चिमुकल्याचं अपहरण करून व्यापाऱ्याला विकण्याचा प्रयत्न उधळला, आरोपीला अटक
ठाणेकर दिवाळीच्या सुट्टीवर; टीएमटीचा गल्ला अर्ध्यावर, प्रवासी नसल्याने बसेस रिकाम्या धावू लागल्या