धावत्या खासगी बसने अचानक घेतला पेठ, चालकाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

धावत्या खासगी बसने अचानक घेतला पेठ, चालकाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

तुळजापूर शहरापासून काही अंतरावर नागोबा मंदिर परिसरात शनिवारी (दि.११ ऑक्टोबर) दुपारी २:३० वाजताच्या सुमारास नांदेड येथील शर्मा ट्राव्हल लातूर तुळजापूर वरून सोलापूर कडे जाताना ब्रेक लायनर जाम झाल्याने ट्राव्हलसने भिषण पेट घेतला घेतल्याची धक्कादायक घटना घडली. तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्स (एमएच-२६ सीएच-१८३०) या प्रवासी बसला अचानक आग लागली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, देवराज हॉटेलसमोर जात असताना बसच्या ब्रेक लाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इंजिन व टायरमधून अचानक धूर निघू लागला. चालक परमेश्वर शहाजी केंद्रे (रा. वागदरवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि कंडक्टरला सुरक्षित बाहेर काढले.

दरम्यान, बसमधून येणाऱ्या फटफट आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच तुळजापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाची गाडी व तामलवाडी टोलनाक्याची ॲम्बुलन्स (१०३४) तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर करून आग विझवली .

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ब्रेक लाइनर जाम झाल्याने टायर घासून गरम झाले आणि त्यातूनच आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी तुळजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तसेच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनात अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू; 13 जण जखमी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनात अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू; 13 जण जखमी
अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना समोर आली आहे. नॉर्थ कॅरोलिनात विकेंड पार्टीदरम्यान अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला...
संपूर्ण जीवनात महिला किती किलो लिपस्टीक खातात ? जाणून बसेल धक्का
भारतात श्वास घेणंही कठीण, प्रदूषणामुळे गेल्या 10 वर्षांत 38 लाख जणांचा मृत्यू
एमडी होण्याचे स्वप्न भंगले… शैक्षणिक कर्जही फिटले नाही; आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
औषध कंपन्यांनी भाजपला ९४५ कोटी रुपयांची दिली देणगी, सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल दिग्विजय सिंह यांचा दावा
भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी; निर्णयाकडे देशभरातील प्राणीप्रेमींचे लक्ष
गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा