सोने सव्वा लाखांवर; चांदीची 2 लाखांच्या दिशेने वाटचाल, दरात आणखी तेजीची शक्यता

सोने सव्वा लाखांवर; चांदीची 2 लाखांच्या दिशेने वाटचाल, दरात आणखी तेजीची शक्यता

सोन्या चांदीच्या किंमती आता गगनाला भिडल्या आहेत. सोन्यासह चांदीही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबोहर गेली आहे. त्यामुळे आता अनेकजण 9 कॅरेट गोल्डकडे वळले आहे. तसेच सोने आणि चांदीमध्ये दरवाढीची स्पर्धाच लागलेली दिसत आहे. चांदीचे दर दोन दिवसात तब्बल 20 हजार रुपयांनी वाढले आहेत. तर सोनेही आता सव्वालाखावर गेले आहे. आता चांदी 1 लाख 70 हजारांवर असून तिची 2 लाखांच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. तर सोनेही पुढील वर्षात दीड लाखांचा टप्पा गाठेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

चांदीच्या दरवाढीनं रेकॉर्ड निर्माण केला आहे. चांदीचे दर दोन दिवसात 20 हजारांनी वाढले आहेत. तर सोनं सव्वा लाख रुपयांवर पोहोचलंय. जागतिक पातळीवर चांदीची मागणी वाढत आहे. मात्र, मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसात तब्बल वीस हजारांची वाढ होऊन चांदीचे दर हे 1,70,000 वर पोहोचले आहेत. रशिया युक्रेन युद्ध,अमेरिकन फेडरल बँकांचे व्याज दर कमी होण्याचे संकेत,आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे राज बदलणारे धोरण याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन सोन्याचे दर 125000 वर जाऊन पोहोचले आहेत.

सध्या सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही तेजी दिसून येत आहे. सोन्याला ही किमतीमध्ये मागे टाकत ,चांदीच्या दराने दोन दिवसात 20 हजारांची विक्रमी वाढ नोंदवले असून आता चांदीने 170000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या दोन दिवसात चांदीमध्ये 20 हजारांची वाढ झाली आहे. औद्योगिक कारणास्तव चांदीचा वाढलेला वापर,आणि मागणीच्या तुलनेत कमी होणारा पुरवठा हे कारण लक्षात घेता,चांदीचे भाव सोन्याच्या तुलनेत अजूनही वाढू शकत असल्याचा अंदाज आहे.

जास्त परतावा मिळण्याची शक्यता लक्षात घेता,जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी चांदी मधे ही गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याने,चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे,पुढील काही दिवसातच चांदी दोन लाखांचा टप्पा पार करू शकते,असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर सोनेही लवकरच दीड लाखांचा टप्पा गाठेल, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;