मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल पुरस्कार जाहीर, उतावीळ ट्रम्प यांना झटका
नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी पुरस्कारासाठी ३३८ उमेदवार होते. त्यापैकी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. त्यांनी स्वतः अनेक वेळा नोबेल पुरस्कारासाठी उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी अलीकडेच सांगितले की, ते या पुरस्कारास पात्र आहेत. त्यांनी हिंदुस्थाना आणि पाकिस्तानमधील युद्धासह सात युद्धे थांबवली होती. परंतु आता मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगले आहे. त्यांच्या जागी मारिया कोरिना मचाडो यांना शांतता पुरस्कार देण्यात आला. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मचाडो यांना हा पुरस्कार देण्यात आला.
नोबेल पुरस्कार जाहीर करताना समितीने म्हटले आहे की त्यांनी नेहमीच धाडसी व्यक्तींचा सन्मान केला आहे. ज्यांनी दडपशाहीविरुद्ध उभे राहून स्वातंत्र्याची आशा निर्माण केली आहे. समितीने नमूद केले की मचाडो यांना गेल्या वर्षी स्वतःचे रक्षण करण्यासाठी लपून बसावे लागले. असे असूनही त्यांनी मायदेशातच राहण्याचा निर्णय घेतला.
ट्रम्प यांना आठ देशांनी नोबेल पुरस्कारासाठी नामांकन दिले होते. यामध्ये पाकिस्तान आणि इस्रायल व्यतिरिक्त अमेरिका, आर्मेनिया, अझरबैजान, माल्टा आणि कंबोडिया यांचा समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List