लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या महिला 50 तुकड्यात… उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे धक्कादायक वक्तव्य
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल व गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी वाराणसी येथील एका कॉलेजच्या दीक्षांत सोहळ्यात धक्कादायक वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी मुलींना लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मुलींना आवाहन केले आहे. ”लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या महिला 50 तुकड्यात कापल्या गेलेल्या आपण पाहिल्या आहेत.”, असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.
वाराणसी मधील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात आनंदीबेन पटेल प्रमुख पाहुण्या होत्या. ”मला मुलींना फक्त एक गोष्ट सांगायची आहे. लिव्ह इन रिलेशनशिप हा हल्ली ट्रेंड बनला आहे. पण त्यापासून दूर रहा. नाहीतर आपण महिलांना 50 तुकड्यात कापले गेलेले पाहिले आहे”, असे वक्तव्य आनंदीबेन यांनी केले आहे.
”गेल्या काही दिवसांपासून या अशा घटना मी ऐकत आहे. मी विचार करत बसते की मुली का अशा करत असतात? फार दु:ख होतं मला ते पाहून” असेही त्या म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List