सिद्धिविनायक मंदिराकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत
महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेतजमिनीचे आणि नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले असून अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे बाधित झालेल्यांना पूर्वपदावर येण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने न्यास व्यवस्थापन समितीने 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List