Pandharpur News – नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू

Pandharpur News – नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहेत, असे अलंकार उत्सवाप्रसंगी श्रींस परिधान करण्यात येतात. नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

शिवकालीन, पेशवेकालीन अनेक अमूल्य दागिणे श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेस असून, यामध्ये श्री विठ्ठलास सोन्याचे पैंजण, बाजीराव कंठी, मत्स्य, तोडे, सोवळे (धोतर), हिऱ्यांचा कंबरपट्टा, बाजुबंद, दंडपेट्या, मणिबंध, सोन्याची राखी, तुळशीची सोन्याच्या मण्यांत गुंफलेली माळ, कौस्तुभमणी, हिरे, पाचूंनी गुंफलेली मोत्यांची कंठी, बोरमाळ, मोत्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, मोहरांच्या माळा, नवरत्नांचा हार, सोन्याचे मुकुट, हिऱ्यांचा मुकुट, सोन्याची शिंदेशाही पगडी, चांदीची काठी, सोन्याची मकरकुंडले, नील व हिरे बसवलेला नाम- म्हणजे सोन्याचा गंध, असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत. श्री रुक्मिणी मातेस सोन्याचे वाळे, पैंजण, साडी, कंबरपट्टे, माजपट्टा, रत्नजडित पेट्या, हिरे, माणिक, पाटल्या, मोत्यांच्या व रत्नजडित जडावांच्या बांगड्या, गोठ, तोडे, हातसर आहेत.

गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र, दशावतारी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाचूची गरसोळी, लहान सरी, मोठी सरी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, एकदाणी, बोरमाळ, ठुशी, तुळशीचा हार, झेला, पोहे हार, चंद्रहार, चपलाहार, पेटय़ांचा हार, शिंदेशाही हार, तन्मणी, चिंचपेटी, नवरत्नांचा हार, शिंदे हार, जवाच्या माळा आणि हायकोल सुर्य-चंद्र असे दागिने आहेत. हिऱ्यांचे खोड असलेला तन्मणी, तारामंडल असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत. सदरचे अलंकार जतन व सुरक्षततेच्या दृष्टीने प्रतिवर्षी गाठविण्यात येतात. सदरचे काम नवरात्र उत्सवापूर्वी करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षी सदरचे अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

‘मकर कुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभमणी विराजित।’ असे अलंकाराचे वर्णन अनेक अभंगांतून संतांनी केलेले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Latur News – फी साठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्याला संपवले, आरोपी मुलाला अटक Latur News – फी साठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्याला संपवले, आरोपी मुलाला अटक
फी साठी पैसे दिले नाही म्हणून 24 वर्षाच्या तरुणाने लाकडाने मारहाण करत वडिलांची हत्या केल्याची घटना चाकूरमध्ये घडली. याप्रकरणी आईच्या...
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ ट्रम्प यांची घेणार भेट, असीम मुनीरही असतील सोबत
ICC Women’s ODI Rankings – स्मृती मानधनाने सिंहासन काबीज केलं, महिला फलदाजांच्या क्रमवारीत पटकावला पहिला क्रमांक
Mumbai News – पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड, लोकल सेवा कोलमडली; गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीराने
मुंबईत बाइक टॅक्सी वाढवून भाजप सरकारचा ‘बेस्ट’ला संपवण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
शिवसेनेचे मनपासमोर ‘बोंब मारो’ आंदोलन; भ्रष्ट कारभार, दिशाहीन नियोजनाबद्दल संताप
Ahilyanagar News – अजगर पाहताच शेतकऱ्याची भंबेरी उडाली, सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने पकडलं