त्वचेची काळजी घेण्यासाठी उटणे का गरजेचे आहे, वाचा

त्वचेची काळजी घेण्यासाठी उटणे का गरजेचे आहे, वाचा

बहुतांशी लोक चेहऱ्याच्या काळजीकडे लक्ष देतात, परंतु हात आणि पायांची काळजी मात्र घेत नाहीत. सौंदर्य टिकवताना आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. चेहऱ्याव्यतिरिक्त आपले हात आणि पाय चांगले दिसणे देखील महत्त्वाचे आहे. कारण आपले हात पायही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम चेहऱ्यावर तसेच शरीराच्या त्या भागांवर होतो जे बहुतेक उघडे असतात. यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. नियमित त्वचेची काळजी घेऊन हात आणि पायांची त्वचा निरोगी ठेवू शकतो. परंतु बहुतेक लोकांना हे त्रासदायक वाटते. म्हणून आपण उटणे चेहऱ्यासोबत हाता-पायांना लावल्याने त्वचेची काळजी घेतली जाईल. तसेच यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यासही मदत होते.

Skin Care – ऋतूनुसार तुमच्यासाठी कोणते फेशियल योग्य आहे? वाचा

उटण्याचा वापर हा आपल्याकडे फार पूर्वीपासून केला जातो. अंघोळीपूर्वी नियमितपणे उटणे त्वचेवर लावण्याचे खूप सारे फायदे आहेत. यामुळे आपली त्वचा खोलवर स्वच्छ होते. तसेच त्वचा निरोगी सुद्धा राहते. उटणे आपल्या त्वचेसाठी स्क्रबपासून मॉइश्चरायझरपर्यंत काम करते.

उटणे कसे बनवावे?
उटणे बनवण्यासाठी मसूर डाळ पावडर, मुलतानी माती, बेसन, हळद, चंदन पावडर. वाळलेल्या संत्र्याच्या सालीची आवश्यकता असेल. या सर्व गोष्टी त्वचेचा रंग सुधारण्यापासून ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यापर्यंत, चमक वाढवण्यापर्यंत आणि त्वचेच्या अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यापर्यंत काम करतात.

तूप की तेल? आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय, जाणून घ्या

मसूर मिक्सरमध्ये बारीक करा, यासोबत मुलतानी माती बारीक करा आणि पावडर बनवा किंवा तुम्ही बाजारातून बारीक करून खरेदी करू शकता. संत्र्याच्या साली बारीक करून पावडर बनवा. यानंतर, मसूर, मुलतानी माती, चंदन पावडर, संत्र्याची पावडर यासह सर्व गोष्टी एका भांड्यात समान प्रमाणात मिसळावे. परंतु फक्त एक चमचा हळद गरजेची आहे.

उटणे कसे लावावे?
उटणे लावायचे असेल तेव्हा गरजेनुसार एका भांड्यात काढावे. (उटण्याला पाण्याचा हात लावू नये.) उटण्यात नंतर गुलाबपाणी, दूध बदाम तेल घालावे. ही पेस्ट चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर लावावी. अर्ध्या तास उटणे त्वचेवर तसेच ठेवावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता दुर्मिळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेल म्हणून...
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सापडले हजारो अपात्र लाभार्थी, सरकारला 100 कोटींहून अधिक नुकसान
आज खरी भाजप सत्तेत नाहिये, भारत – पाकिस्तान सामन्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला
संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाणार! नाशिकमधील विराट मोर्चातून संजय राऊत यांची गर्जना
किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान
60 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपावर शिल्पा शेट्टीच्या पतीने सोडले मौन
कसा विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावर? मोदी-फडणवीस यांचे व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया यांचा घणाघात