वांद्रे स्कायवॉकचे बांधकाम 15 महिन्यांत पूर्ण करू

वांद्रे स्कायवॉकचे बांधकाम 15 महिन्यांत पूर्ण करू

वांद्रे पूर्व भागातील स्कायवॉकचे बांधकाम रखडवल्यामुळे अवमान कारवाईचा इशारा मिळताच मुंबई महापालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात लोटांगण घातले. कामासाठी विविध परवानग्या व इतर प्रशासकीय कामांमुळे स्कायवॉक बांधकामाला उशीर झाल्याची कबुली पालिकेने दिली. त्यानंतरही न्यायालयाने कठोर भूमिका कायम ठेवल्याने पुढील 15 महिन्यांच्या आत स्कायवॉक बांधकाम पूर्ण करू, अशी लेखी हमी पालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱयांनी दिली. त्यावर दर तीन महिन्यांनी स्कायवॉक बांधकामाचा प्रगत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले.

वांद्रे पूर्वेला स्कायवॉक नसल्यामुळे नागरिकांचा गैरसोय होत असल्याचा दावा करीत अॅड. के. पी. पी. नायर यांनी याचिका दाखल केली. त्यावर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. वर्षभरापूर्वी पालिका अधिकाऱयांनी हमी दिल्यानंतर न्यायालयाने रिट याचिका निकाली काढली होती, मात्र वर्षभरात स्कायवॉकची साधी पायाभरणीही केली नाही. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी खंडपीठाने पालिकेचे वकील अॅड. अनिल सिंग यांना, हे काय चाललेय? अधिकारी न्यायालयात दिलेला शब्दही पाळत नाहीत का? अशी संतप्त विचारणा केली. त्यावर अॅड. अनिल सिंग यांनी पालिकेचे अपयश मान्य करत काम पूर्ण न करण्यामागील कारणांची यादी सादर केली.

फुटपाथबाबत बैठकीचे आदेश

वांद्रे रेल्वे स्थानक ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंतच्या फुटपाथचे पुनर्बांधकाम आणि देखभालीसाठी रेल्वे प्रशासन व एमएसआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱयांसोबत बैठक घेऊन आवश्यक ती पावले उचला, असे आदेश न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले. फुटपाथ असलेली जागा रेल्वेची आहे, तर नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची जबाबदारी आहे, असे पालिकेने कळवल्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले.

वरिष्ठ अधिकारी कोर्टात हजर

न्यायालयाने मागील सुनावणीवेळी मुंबई महापालिकेला थेट अवमान कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे पालिका प्रशासन हादरले होते. बुधवारी अवमान कारवाई होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी पालिकेचे संबंधित सर्वच वरिष्ठ अधिकारी सुनावणीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बिपाशा बासूवरून जॉन अब्राहमसोबत होतं भांडण? बऱ्याच वर्षांनंतर डिनो मोरियाकडून खुलासा बिपाशा बासूवरून जॉन अब्राहमसोबत होतं भांडण? बऱ्याच वर्षांनंतर डिनो मोरियाकडून खुलासा
अभिनेता जॉन अब्राहम आणि डिनो मोरिया यांनी मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर चित्रपटांकडे मोर्चा वळविला. या दोघांमध्ये कायम...
Video : दीपिका पडूकोण का चिडली ? कॅमेऱ्यावरच काढला राग, बेबी बंपही…
तब्बल 9 वर्षांनंतर ती परत येतेय; नव्या मालिकेत शिवानी सुर्वेचा नवा अंदाज
शरद पवारांचे विलीनीकरणाचे संकेत;खरंच हे पक्ष बांधतील काँग्रेससोबत मोट?
Navneet Rana : ‘फक्त 15 सेकंदांसाठी…’, हैदराबादमध्ये जाऊन नवनीत राणांच ओवैसींना ओपन चॅलेंज, VIDEO
Maharashtra Political News live : मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर यांना निवडणूक आयोगाची नोटीस
IPL 2024 – संघमालकाने केएल राहुलला ऑन कॅमेरा झापले; चाहत्यांनी केली तत्काळ टीम सोडण्याची मागणी