सत्तर टक्के भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण बंधनकारक
भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून त्यांना जिथून पकडले तिथे परत सोडून द्या. तसेच ज्या कुत्र्यांना रेबीजची लागण झाली आणि जे आक्रमक दिसतात अशा कुत्र्यांना फक्त निवारा केंद्रांमध्ये ठेवण्यात यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर आता केंद्र सरकारने पुढील पावले उचलत किमान 70 टक्के कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करणे बंधनकारक केले आहेत. तसे निर्देश केंद्राने सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. नसबंदी आणि लसीकरण केल्यानंतर भटक्या श्वानांना पुन्हा मूळ ठिकाणी सोडावे, असे निर्देशही दिले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने पशु रुग्णालये आणि निवारा केंद्रांना 2 कोटी रुपयांचे एक वेळ अनुदान देण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List