जखम साबणाने धुतल्यानंतर रेबीज धोका कमी होतो ? काय म्हणतात WHO चे तज्ज्ञ
कुत्र्यांवरुन दिल्लीत कोर्टाने आदेश दिल्यानंतर आता हा मुद्दा चर्चेत आला आहे. देशात अनेक ठिकाणी कुत्र्याने लहान मुलांना चावल्याने व्हिडीओ अधूनमधून व्हायरल होत असतात. अनेकदा अशा घटनेत भयंकर जखमा किंवा मृत्यू देखील होतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील भटक्या कुत्र्यांसंदर्भात कठोर निर्णय देत त्यांना शेल्टर होममध्ये नेण्याचे आदेश दिले आहेत. या कामात कोणी आडकाठी आणली तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
या निकालानंतर अनेक प्राणी प्रेमी आणि प्राणी मित्र संघटनांनी यास विरोधही केला आहे. या दरम्यान मनेका गांधी यांची बहिण प्राणी हक्क संघटनेच्या कार्यकर्त्या अंबिका शुक्ला यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटलेय की रेबीज खूपच नाजूक व्हायरस असून केवळ साबण आणि पाण्याने धुतल्याने तो संपतो असा दावा त्यांनी केला आहे. आता प्रश्न हा उत्पन्न होतो की साबणाने धुतल्यानंतर खरंच रेबीज जंतू मरतात का ? ही यानंतरही योग्य उपचाराची गरज आहे.चला तर पाहूयात साबणाने धुतल्याने रेबीजचे जंतू पासून वाचता येईल का ?
साबणाने धुतल्याने रेबीज पासून वाचता येते का ?
कुत्र्याने चावल्यानंतर रेबीजपासून वाचण्यासाठी केवळ साबणाने जखम धुणे पुरेसे नाही. हा हे एक आवश्यक पहिले पाऊल आहे, परंतू संपूर्ण उपचार नाही. जागतिक आरोग्य संघटना ( WHO)आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोणा जनावराने चावले असेल खास करुन पिसाळलेल्याचा संशय असलेल्या प्राण्यापासून रेबीजचा धोका असल्याने जखम १० ते १५ मिनिटे वाहत्या पाण्यात साबणाने नीट धुतली पाहीजे. त्यामुळे जखमेच्या पृष्ठभागातील व्हायरस, बॅक्टेरिया आणि घाण बऱ्याच प्रमाणात स्वच्छ होते. परंतू लक्षात ठेवा हा एक प्रथमोपचार आहे. यातून रेबीजपासून संपूर्णपणे सुटका होत नाही. घाव धुतल्यानंतर तुम्हाला डॉक्टरांना भेटून तातडीने व्हॅसीन घ्यावी लागते.
रेबीज किती धोकादायक ?
रेबीज हा एक जीवघेणा आजार आहे. हा एक असा व्हायरल आहे जो संक्रमित जनावराने चावल्याने माणसाच्या शरीरात पोहचून हळूहळू मेंदूवर परिणाम करतो. एकदा का रेबीजची लक्षणे सुरु झाली की याचा उपचार करणे कठीण होते. बहुतांश प्रकरणात मृत्यू होतो. WHO च्या मते दरवर्षी जगभरात हजारो लोक रेबीजने मरतात. ज्यात सर्वाधिक केस भारतातील असतात. भारतात दरवर्षी १८ हजार ते २० हजार मृत्यू रेबीजने होतात. जे जगात रेबीजने होणाऱ्या मृत्यूच्या ३६ टक्क्यांहून अधिक आहे. रेबीजने सर्वाधिक धोका लहान मुलांना असतो. तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आणि जे पाळीवप्राण्यांच्या सानिध्यात जास्त असतात त्यांनाही धोका असतो.
कुत्रा चावल्यावर काय करावे ?
WHO नी जनावरे चावण्याच्या तीन लेव्हल सांगितल्या आहेत. ज्यात पहिला केवळ जनावरांना स्पर्श करणे किंवा त्यांच्या जवळ रहाणे, यात कोणताही उपचार करण्याची गरज नाही. दुसरी लेव्हल म्हणजे जनावरांची नखं लागणे, किंवा चाटणे यावर जखम धुवावी आणि तातडीने व्हॅसीन घ्यावी. तिसरी लेव्हल जखम मोठी असेल तर साबण आणि पाण्याने किमान १५ मिनिटे धुवावी,यामुळे व्हायरसची संख्या कमी होती. एंटीसेप्टीक लावावे, उदा.डेटॉल, सेव्हलॉनस वा आयोडीन कोणतेही एंटीसेप्टीक लावावे आणि लवकराच लवकर डॉक्टरांची भेट घ्यावी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List