पुणे पालिकेच्या अॅपवर पहिल्याच दिवशी खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस
पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने ‘पीएमसी रोड मित्र’ नावाचे एक विशेष मोबाईल अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे नागरिकांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते थेट महापालिकेच्या पथ विभागाला पाठविता येणार आहेत. पहिल्याच दिवशी पुणेकरांनी या अॅपद्वारे ४३ ठिकाणच्या समस्या पालिकेला कळवल्या आहेत. त्यावर कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नाही. हे खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू केल्याचा दावा पालिकेने केला आहे.
आता पीएमसी रोड मित्र अॅप फायदेशीर ठरेल, असा दावा पालिकेने केला आहे. सध्या हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, लवकरच आय स्टोअरवरही हे अॅप उपलब्ध होईल. हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर एका वन टाइम पासवर्ड द्वारे (ओटीपी) नोंदणी करता येईल. त्यानंतर नागरिक कोणत्याही खड्याचे दोन ते तीन फोटो व व्हिडीओ या अॅपवर अपलोड करू शकतात. फोटो अपलोड होत असतानाच, संबंधित ठिकाणचे अक्षांश रेखांशदेखील नोंदवले जाणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना खड्ड्यांची नेमकी जागा लक्षात येईल.
‘पीएमसी रोड मित्र’ नावाच्या मोबाईल अॅपचे अनावरण नुकतेच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले. सध्या पीएमसी केअर, ईमेल आणि आपले सरकारकडून खड्ड्यांबाबतच्या तक्रारी येतात. पीएमसी रोड मित्र अॅप्लिकेशनवर बुधवारी ४३ तक्रारी आल्या आहेत. यात खड्डे, ड्रेनेज चेंबरच्या झाकणांविषयी या तक्रारी आहेत. या तक्रारींवर कार्यवाही सुरू झाली आहे.
– अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List