एससी-एसटी आरक्षणात क्रीमी लेयरची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली, 10 ऑक्टोबरला सुनावणी; केंद्र सरकारला नोटीस
एससी आणि एसटी आरक्षणात क्रीमी लेयर लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज स्वीकारली. या याचिकेवर आता न्यायालय 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार आहे. आरक्षणाचा फायदा बहुतेक एससी आणि एसटीच्या श्रीमंत तसेच बळकट वर्गाला मिळत आहे, तर गरीब लोक मागे राहतात, असा कळीचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, एससी आणि एसटी आरक्षणात क्रीमी लेयर लागू करणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केली आहे.
रमाशंकर प्रजापती यांनी ही याचिका दाखल केली आहे. एससी आणि एसटी आरक्षणात दोन स्तर असावेत, प्रथम आर्थिकदृष्टय़ा कमकुवत लोकांना आणि नंतर इतरांना संधी मिळावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला याप्रकरणी नोटीस बजावली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List