महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह चार जणांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) बुधवारी अटक केली. वसई-विरारमधील अनधिकृत बांधकाम प्रकरणात ही कारवाई झाली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नगररचना उपसंचालक (निलंबित) वाय. एस. रेड्डी, माजी नगरसेवक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांचा समावेश आहे.
ईडीने पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. ज्यात नाशिक येथील त्यांच्या नातेवाईकाकडून १.३३ कोटी रुपये रोख आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. रेड्डी यांच्याकडून ८.६० कोटी रोख आणि २३.२५ कोटींचे दागिने हस्तगत झाले. ६० एकर जागेवर ४१ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या, ज्या सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि कचरा डेपोसाठी राखीव होत्या. बनावट कागदपत्रांद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. सर्व आरोपींना गुरुवारी पीएमएलए न्यायालयात हजर केले जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List