इराणच्या निशाण्यावर डोनाल्ड ट्रम्प, कधीही होऊ शकतो ड्रोन हल्ला; खामेनी यांच्या जवळच्या व्यक्तीची धमकी, अमेरिका अलर्ट मोडवर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा इराणडून धमकी देण्यात आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे जवळचे सल्लागार हस्ती जावेद लारीजानी यांनी म्हणाले आहेत की, ट्रम्प आता फ्लोरिडामध्येही सुरक्षित नाहीत. या धमकीमुळे अमेरिका अलर्ट मोडवर आहे.
ही धमकी अमेरिकेने इराणच्या परमाणु ठिकाण्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर आली आहे. लारीजानी यांनी म्हटले की, ट्रम्प यांच्या कृतींमुळे ते इराणच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांनी ड्रोन हल्ल्याची शक्यता व्यक्त करत, ट्रम्प यांच्या हत्येसाठी 2 कोटी 70 लाख डॉलरच्या बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपली सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असताना, हा धोका कितपत गंभीर आहे, याबाबत सध्या तपास सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List