Devgad News एसटी बस व रिक्षाची जोरदार धडक, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Devgad News एसटी बस व रिक्षाची जोरदार धडक, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना सायंकाळी 3.45 वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकाचा समावेश आहे.

मृत व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आहेत: संकेत सदानंद घाडी (वय 35, आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (वय 35, आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक(वय 35, आचरा गाऊडवाडी) आणि सोनू कोळंबकर (वय 45,आचरा पिरावाडी). या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोवा येथील बांभुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

विजयदुर्ग-मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात रिक्षातील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील संकेत घाडी यांनी केवळ पंधरा दिवसांपूर्वी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.या दुर्घटनेमुळे संपूर्ण आचरा गावावर शोककळा पसरली आहे.आचरा येथील रिक्षा व्यावसायिक या दुर्दैवी घटनेने प्रचंड हादरले आहेत. ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून गावात शोकाकुल वातावरण आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल