एअर इंडियाच्या उड्डाणात तीन तासांहून अधिक विलंब, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

एअर इंडियाच्या उड्डाणात तीन तासांहून अधिक विलंब, सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एअर इंडियाच्या खराब सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया उड्डाण AI 2971 मध्ये तीन तासांहून अधिक विलंब झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. याच विमानाने त्याही प्रवास करत आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत X वर एक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी एअर इंडियाच्या गैरव्यवस्थापनावर आणि प्रवाशांप्रती उदासीनतेवर टीका केली आहे. त्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय आणि मंत्र्यांना हस्तक्षेप करून एअर इंडियाला जबाबदार धरण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या उड्डाण AI 2971 ने प्रवास करत होत्या. मात्र हे विमान उड्डाण करण्यासाठी तीन तासांहून अधिक काळ उशिराने निघाले. या विलंबाबाबत एअर इंडियाकडून प्रवाशांना कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.

सुप्रिया सुळे याबाबत X वर पोस्ट करत म्हटलं आहे की, प्रवाशांना उत्तम सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी म्हटले, “एअर इंडियाची ही उदासीनता अस्वीकार्य आहे. प्रवाशांना अडकून पडावे लागते आणि त्यांना कोणतेही सहाय्य मिळत नाही. याबाबत तातडीने कारवाई करून प्रवाशांना न्याय मिळाला पाहिजे.” त्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय आणि टाटा समूहाकडे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;