माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही, राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना पत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष्य राज ठाकरे यांचा येत्या 14 जून रोजी वाढदिवस आहे. मात्र या दिवशी ते सहकुटुंब मुंबईबाहेर असणार आहेत. यामुळे त्यांना कार्यकर्त्यांची भेट घेणं शक्य होणार नाही, असा संदेश त्यांनी X वर एक पत्र पोस्ट करत कार्यकर्त्यांना दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, याचे कोणतेही अर्थ काढू नका.
काय म्हणाले राज ठाकरे?
X वर पत्र पोस्ट करत राज ठाकरे म्हणाले आहेत की, “येत्या 14 जून 2025 ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की, मी वाढदिवस साजरा का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का ? इत्यादी. पण मनापासून सांगतोय की ,खरतर असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या 14 जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका.”
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो,
सस्नेह जय महाराष्ट्र ! pic.twitter.com/tNKyuHkCgm— Raj Thackeray (@RajThackeray) June 11, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List