टीव्हीवरील ‘राम-सीते’च्या घरात चोरी; नोकरानेच केला हात साफ

टीव्हीवरील ‘राम-सीते’च्या घरात चोरी; नोकरानेच केला हात साफ

टेलिव्हिजनवरील ‘रामायण’ या मालिकेत राम आणि सीतेची भूमिका साकारणारे कलाकार गुरमीत चौधरी आणि डेबिना बॅनर्जी यांच्या घरात चोरी झाली. त्यांच्या घरातील नोकरानेच ही चोरी केली आहे. सुदैवाने गुरमीत त्यावेळी घरी होता. त्याची दोन्ही मुलं आणि इतर कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती त्याने दिली. चोराला पकडलं गेलं असून चोरीला गेलेलं काही सामान परत मिळवण्यातही पोलिसांना यश आलं आहे. गुरमीतने सोशल मीडियावर पोस्ट लिहित या घटनेची सविस्तर माहिती दिली.

गुरमीत चौधरीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ‘अलर्ट- आज एका नवीन वर्करने (नोकर) आपल्या घरातून काही सामानाची चोरी केली आणि तो पळून गेला. सुदैवाने आम्ही कोणालाही कामावर ठेवताना त्यांची नीट चौकशी करतो. त्यामुळे आम्ही लगेच कारवाई करू शकलो. नशिबाने मी तेव्हा घरातच होतो आणि माझी मुलं त्यांच्या रुममध्ये सुरक्षित आहेत. काही कॉल्स केल्यानंतर आम्हाला चोरीला गेलेलं बरंचसं सामान परत मिळालं. पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. थोडं नशिब खराब होतं, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की, तुम्हाला घरातसुद्धा नेहमीच अलर्ट राहावं लागेल. आपल्या घरात कोणालाही कामावर ठेवण्याआधी त्या व्यक्तीची नीट चौकशी करा.’

गुरमीत आणि डेबिनाने काही महिन्यांपूर्वीच मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नव्या घराची आणि गृहप्रवेशाची झलकसुद्धा दाखवली होती. या घराची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचं कळतंय. गुरमीत आणि डेबिना हे राम-सीतेच्या भूमिकेतून घराघरात पोहोचले. याच मालिकेदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2011 मध्ये त्यांनी लग्न केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Debinna Bonnerjee (@debinabon)

डेबिनाने एप्रिल 2022 मध्ये मुलगी लियानाला जन्म दिला. त्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिविशा या दुसऱ्या मुलीचा जन्म झाला. 2009 मध्ये या दोघांनी ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. हे दोघं लवकरच ‘पती पत्नी और पंगा- जोडियों की रिॲलिटी’ या नव्या टीव्ही शोमध्ये एकत्र झळकणार आहेत. गेल्या महिन्यातच या शोची घोषणा कलर्स टीव्हीने केली होती. डेबिनाची दुसरी गर्भधारणा ही नैसर्गिक पद्धतीने झाली असली तरी दिविशाचा जन्म डिलिव्हरीच्या तारखेआधी झाला होता. त्यामुळे तिला रुग्णालयात काही दिवस दाखल करण्यात आलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साईबाबांवरील वक्तव्याचा वाद चिघळला; शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल साईबाबांवरील वक्तव्याचा वाद चिघळला; शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
श्री साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या भक्त, सेविका लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत, यावरून निर्माण...
शनिभक्तांची फसवणूक करून दोन कर्मचारी झाले करोडपती; शनी शिंगणापूर बनावट अॅप प्रकरण
शेअर ट्रेडिंगमध्ये 40 लाखांची फसवणूक; गुजरातमधील चार आरोपींना अटक
उजनीतून विसर्ग घटला; पंढरीतील पुराचे संकट टळले
सोलापूर विद्यापीठाचा मंगल शहा यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
सांगली जिल्हा बँकेची कारवाई; 2.11 कोटींचा अपहार, सात कर्मचारी बडतर्फ
बनावट कागदपत्रांनी 44 लाखांची फसवणूक; कोल्हापुरात 25 जणांविरुद्ध गुन्हा