अशोक सराफ शर्टची वरची दोन बटणं नेहमी उघडी का ठेवतात? स्वत:च सांगितलं होतं कारण

अशोक सराफ शर्टची वरची दोन बटणं नेहमी उघडी का ठेवतात? स्वत:च सांगितलं होतं कारण

कॉमेडीच्या अचूक टायमिंगसाठी अभिनेते अशोक सराफ ओळखले जातात. विनोदी भूमिकांपासून ते गंभीर पात्रांपर्यंत अभिनय करणारे अभिनेते अशोक सराफ . अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने आपला चाहता बनवलं. एवढच नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब म्हणजे 27 मे रोजी अशोक सराफ यांना राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज म्हणजेच 4 जूनला अशोकमामा त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक आठवणी, यश आणि प्रेरणादायी किस्से घडले आहेत.

बँकेची नोकरी पण मनात कायम अभिनयाची गोडी 

अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली झाला. शिक्षणानंतर त्यांनी वडिलांच्या इच्छेखातर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 10 वर्षे नोकरी केली. मात्र, मनात रंगभूमीचं वेड असल्याने ते गुपचूप नाटकात काम करत राहिले. अखेर अभिनयाच्या प्रेमापायी त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. 1969 मध्ये ‘जानकी’ या मराठी चित्रपटातून त्यांनी सिनेमात पदार्पण केलं. परंतु त्यांना खरी ओळख मिळाली ती 1975 मध्ये आलेल्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटामुळे. या चित्रपटात त्यांनी साकारलेला हवालदार सखाराम प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.

अशोकमामा शर्टाची वरची दोन बटणं उघडी का ठेवण्याची?

मात्र अनेक चित्रपटांमध्ये त्यांची एक खास स्टाईल पाहायला मिळते ती अनेकांच्या लक्षातही आली असेल ती म्हणजे ते कायम त्यांच्या शर्टची वरची दोन बटणं उघडी ठेवायचीय आजही त्यांची ही सवय कायम आहे. पण त्यामागे एक रंजक कारण आहे. प्रत्येक कलाकाराची एक वेगळी शैली असते. अशीच अशोकमामांची एक स्टाइल आहे. शर्टाची वरची दोन बटणं उघडी ठेवण्याची. त्या काळात प्रत्येक अभिनेत्याला लोक फॉलो करायचे. हिरोच्या केसांची स्टाइल, त्याचे कपडे सगळ्याची फॅशन व्हायची.तशीच अशोकमामांची ही स्टाईल नंतर अनेक तरुणांनी फॉलो करायला सुरुवात केली. पण त्याचसोबत प्रेक्षकांना कुतुहलही तेवढंच होतं की नक्की यामागे काय कारण आहे.

अशोक सराफांनी आणलेला ट्रेंड 

शर्टाची वरची दोन बटणं उघडी ठेवण्याचा ट्रेंड अशोक सराफ यांनी सेट केला होता. पण अशोक सराफानी स्वत: एका मुलाखतीत याचं कारण अखेर सांगूनच टाकलं होतं. यामागे दोन कारणं होती. एक म्हणजे तेव्हा ही फॅशन नुकतीच आली होती. त्यामुळे अशोकमामाही ती फॉलो करायचे आणि दुसरं म्हणजे कॉलरपर्यंत पूर्ण बटण लावल्यावर मामांना गुदमरल्यासारखं व्हायचं.त्यामुळे वरची दोन बटणं उघडी ठेवल्याने त्यांना बरंच मोकळं वाटायचं सोबतच काम करणंही सोपं व्हायचं. आणि मुख्य म्हणजे त्यांना ती फॅशन शोभून दिसायची.

अशोक मामांची ही फॅशन आजही चर्चेत 

अशोक मामा हे करतायत म्हटल्यावर निर्माते आणि दिग्दर्शकही त्यांना काही बोलायचे नाहीत. मात्र पुढे हीच फॅशन ट्रेंड बनेल असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं. ही फॅशन नंतर अशोक मामांच्या नावाने ओळखली जाऊ लागली. अशोक सराफ यांच्याकडे असलेल्या विनोदाच्या अचूक टायमिंगची नेहमीच चर्चा होत असते, त्याच जोरावर त्यांनी प्रेक्षकांना खळखळू हसवलं. आजही त्यांच्या कामाचं कौतुक होतं आणि कायम होत राहिलं तसेच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान हे प्रचंड मोठं आहे. ज्याची तुलना कधीच होऊ शकत नाही.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साईबाबांवरील वक्तव्याचा वाद चिघळला; शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल साईबाबांवरील वक्तव्याचा वाद चिघळला; शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
श्री साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या भक्त, सेविका लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत, यावरून निर्माण...
शनिभक्तांची फसवणूक करून दोन कर्मचारी झाले करोडपती; शनी शिंगणापूर बनावट अॅप प्रकरण
शेअर ट्रेडिंगमध्ये 40 लाखांची फसवणूक; गुजरातमधील चार आरोपींना अटक
उजनीतून विसर्ग घटला; पंढरीतील पुराचे संकट टळले
सोलापूर विद्यापीठाचा मंगल शहा यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
सांगली जिल्हा बँकेची कारवाई; 2.11 कोटींचा अपहार, सात कर्मचारी बडतर्फ
बनावट कागदपत्रांनी 44 लाखांची फसवणूक; कोल्हापुरात 25 जणांविरुद्ध गुन्हा